जामिया अरेबीया रशिदिया संस्थे अंतर्गत शाळा आणि कॉलेज नागपूर द्वारा आयोजित यौमे-ए- फकीए -ए-आजम हिंद च्या द्वारे सत्कार समारोह मेरीट विद्यार्थ्यांकरिता तसेच यशस्वी व्यक्तीच्या सामाजिक कार्याकरिता माननीय श्री नितीन गडकरीजी (केंद्र मंत्री भारत सरकार) यांच्या शुभहस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले. रविवार दिनांक 19 मार्च 2023 ला सायंकाळी सात वाजता हज हाऊस शौकत अली चौक, नागपूर. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्री समीर मेघेजी आमदार नागपूर श्री अभिजीत वंजारीजी आमदार नागपुर श्री विकास कुंभारेजी आमदार नागपूर श्री सुधाकर अडबालेजी आमदार नागपूर श्री विकास ठाकरेजी आमदार नागपूर श्रीमती रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी प्रायमरी जिल्हा परिषद, नागपूर श्री प्यारे जिया खान अध्यक्ष ताजबाग ट्रस्ट, नागपूर या कार्यक्रमात जामिया अरेबिया रशिदिया संस्थेचे अध्यक्ष हजरत मुफ्ती मोहम्मद अब्दुल कदीर खान साहब आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री मोहम्मद अब्दुल अजीज खान साहब सचिव जामिया अरेबीया रशिदिया या संस्थेचे सचिव यांची उपस्थिती होती. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत अनेक एनजीओ संस्थांनी गरीब तसेच पीडित लोकांकरिता मोठ्या प्रमाणात मदत केली उदाहरणात पाणी वाटप, जेवण वाटप, कपडे वाटप, सिलेंडर वाटप, मास्क वाटप या कठीण परिस्थितीत मोठ्या धैर्याने ज्यांनी समाजकार्य केले अशा कार्यकर्त्यांच्या सत्कार येथे करण्यात आला. याशिवाय बारावी मध्ये मेरिट आलेले गुणवंत विद्यार्थी एवढेच नव्हे तर ज्यांचे प्रवेश एमबीबीएसला झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा तसेच विद्यापीठ स्तरावरील मेरीट विद्यार्थ्यांचा सुध्दा सत्कार मा.नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते आणि वरील नामवंत सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितीन गडकरीजी यांनी आपल्या बीज भाषणात विद्यार्थ्यांकरीता अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले........